‘पद्मावती’च्या प्रदर्शनावरून राजपूत समाज आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काढणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:06 AM2017-11-10T05:06:59+5:302017-11-10T05:07:10+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’विरोधात राजस्थान समाज आणि ३६ कौम एकता परिषदेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध केला.
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’विरोधात राजस्थान समाज आणि ३६ कौम एकता परिषदेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध केला.
मुगल सम्राट अल्लाउद्दीन खिलजीच्या हातून अपवित्र होण्यापेक्षा १६ हजार वीरांगणांसह राणी पद्मावतीने अग्निकुंडात उडी घेतली. अस्मितेच्या या ऐतिहासिक उदाहरणाला भन्साली यांनी खिलजीच्या स्वप्नात नाचताना दाखवले आहे. राजपूत समाजाच्या स्त्रिया असे सार्वजनिक नृत्य करत नसल्याचा संघटनेचा दावा आहे.
भाजपाला घरचा अहेर
भाजपा आमदार राज पुरोहित यांनी राजपूत समाजाने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काढण्यात येणा-या मोर्चात सामील होणार असल्याचे सांगितले. प्रदर्शनास संमती दिल्यास चित्रपटगृहांबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देत त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला.
तर चित्रपट किंवा मनोरंजनाच्या नावाखाली इतिहास आणि संस्कृतीची चुकीची मांडणी करणा-या पद्मावती चित्रपटाला राज्यात बंदी घालण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.