Join us  

Raju shetti : 'करपलेल्या चेहऱ्यांच्या संसाराचा विचार करा, लॉकडाऊन लावू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 4:10 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. तसेच, मुख्यमंत्री महोदय, आमच जगणं-मरण आमच्या नशीबावर सोडा, पण राज्यात लॉकडाऊन लावू नका.

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. १५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. आता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे. 

मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक लोकांना मिळेल याची व्यवस्था करणे, रेशन दुकानांतून तांदूळ, गव्हासोबतच डाळी, साखर, तेलाचाही पुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती आहे. त्याशिवाय दारिद्र्यरेषेवरील व्यक्तींना ८ रुपये किलो गहू आणि १२ रुपये किलो दरावर तांदूळ देण्याची नोव्हेंबरपासून बंद झालेली योजना पुन्हा सुरू करण्याचाही विचार आहे. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नसल्याची भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. तसेच, मुख्यमंत्री महोदय, आमच जगणं-मरण आमच्या नशीबावर सोडा, पण राज्यात लॉकडाऊन लावू नका. राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, दुकानदार यांचे कर्जाचे हप्ते, घरगुती व शेतीपंपाचे लाईट बिल, वाढलेली महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर, यामुळे कंबरडे मोडले आहे. या माझ्या करपलेल्या चेहऱ्यांच्या संसाराचा विचार करून त्यांच जगणं सुसह्य करा, असे भानविक आवाहन राजू शेट्टी यांनी ट्विटरवरुन केलंय. 

बांधकाम कामगारांचाही होणार विचार

१० लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना भांडीकुंडी देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात तत्काळ प्रत्येकी पाच हजार रुपये टाकण्याचाही विचार सुरू आहे. वित्त विभागाने तयार केलेले पॅकेज अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आल्याची माहितीही सुत्रांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात विमान, रेल्वे, बससह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :राजू शेट्टीमुख्यमंत्रीउद्धव ठाकरे