राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:25 AM2024-09-30T06:25:17+5:302024-09-30T06:26:17+5:30

अभिनेत्री संस्कृती बालगुडे कलाकार प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अपात्र ठरली.

Raju Shetty emerged as the 'winner' from Powai; 27 artists interested for two houses of Mhada mumbai lottery 2024 result | राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र

राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘म्हाडा’च्या २ हजार ३० घरांकरिता येत्या ८ ऑक्टोबर रोजी लॉटरी काढली जाणार असतानाच या घरांसाठी राजकीय क्षेत्रासह कलाकार क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींनीही अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत दिग्दर्शक शंतनू रोडे, अभिनेता विजय आंदळकर, किशोरी विज, नारायणी शास्त्री यांचा समावेश आहे. ३ ऑक्टोबर रोजी लॉटरीसाठीची अंतिम यादी म्हाडाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांना पवई येथील घराची लॉटरी लागली आहे. शेट्टी यांनी कोपरी पवई या योजनेत आमदार, खासदार गटातून अर्ज केला होता. येथे लोकप्रतिनिधींसाठी ३ घरे उपलब्ध होती. शेट्टी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने शेट्टी लॉटरीपूर्वीच विजयी झाले आहेत. तर अभिनेत्री संस्कृती बालगुडे कलाकार प्रमाणपत्र अवैध ठरल्याने अपात्र ठरली. २७ कलाकारांनी गोरेगाव येथील घरांना पसंती दिली आहे. येथे कलाकार गटासाठी २ घरे असून, यासाठी २७ कलाकारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे चुरस आहे. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये १ लाख १३ हजार २३५ अर्ज पात्र ठरले. 

बिग बॉस मराठी पर्व ३चा विजेता विशाल निकम, अभिनेता विजय आंदळकर, झुबीन विकी ड्रायव्हर, जिनाल पंड्या, सीमा देशमुख, मृण्मयी भाजक, रोमा बाली, तनया मालजी, गौतमी देशपांडे, अनिता कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी, संचित चौधरी, शेखर नार्वेकर या कलाकारांनी घरासाठी अर्ज केले आहेत. 

Web Title: Raju Shetty emerged as the 'winner' from Powai; 27 artists interested for two houses of Mhada mumbai lottery 2024 result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.