केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारणार - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 03:48 AM2020-01-17T03:48:02+5:302020-01-17T03:48:25+5:30
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशपातळीवरील नेत्यांची आज दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्त्वाची बैठक झाली
मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव द्यावा, आगामी अर्थसंकल्प हा शेतकरी वर्गाला डोळ्यांसमोर ठेवून मांडला जावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केली. शेतकी प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास देशभरातील शेतकरी संघटना आंदोलनावर उतरतील. केंद्रीय मंत्र्यांना घेराव घालून त्यांना रोखून धरतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशपातळीवरील नेत्यांची आज दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. या वेळी योगेंद्र यादवदेखील उपस्थित होते.