Join us

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी तर शिवसेनेकडून उर्मिला, राज्यपालांकडे 12 नावांची यादी सुपूर्द

By महेश गलांडे | Published: November 06, 2020 8:08 PM

शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या नावाची चर्चा होती, त्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या नावाची चर्चा होती, त्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहेत.

मुंबई - महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. त्यामध्ये, काँग्रेसकडून रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचे नाव आहे. तसेच, मीरा भाईंदरचे मुझ्झफर हुसैन आणि अनिरुद्ध वणकर यांना संधी देण्यात आली आहे. 

शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांच्या नावाची चर्चा होती, त्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेनेही आपले चार उमेदवार ठरवले असून, ही नावं बंद लिफाफ्यातून राज्यपालांकडे सोपवण्यात आली आहेत. शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मांतोडकर, शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेनेनं संधी दिली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 4 नावं देण्यात आली एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे, राज्यपालांकडे तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 4 अशा एकूण 12 उमेदवारांच्या नावाची यादी दिली आहे. मात्र, एकनाथ खडसेंच्या नावाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विरोध केला होता. त्यासाठी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेटही त्यांनी घेतली होती. 

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी राज्यपालांना दिली. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास असल्याचं परब म्हणाले

उर्मिलाचा काँग्रेस ते शिवसेना प्रवास 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कामे केली नसल्याची तक्रार मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे मातोंडकर यांनी केली होती. मात्र, पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाहीच, उलट त्यांना पदे दिली. त्यामुळे त्या काँगेस पक्षावर नाराज होत्या. त्यानंतर, उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला होता. त्यानंतर, आता शिवसेनेकडून त्यांना आमदारकीचा लाभ मिळणार आहे. 

खडसेंच्या नावाला दमानियांचा विरोध

भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.

टॅग्स :राजू शेट्टीउर्मिला मातोंडकरशिवसेनाभगत सिंह कोश्यारी