Join us

राजू शिंदे यांचे निधन

By admin | Published: July 03, 2015 3:33 AM

बांधकाम व्यावसायिक, स्थानिक केबल चालक आणि शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४६) यांचे बुधवारी मध्यरात्री रुग्णालयात निधन झाले.

मुंबई : बांधकाम व्यावसायिक, स्थानिक केबल चालक आणि शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४६) यांचे बुधवारी मध्यरात्री रुग्णालयात निधन झाले. यांच्यावर गेल्या महिन्यात गोरेगावच्या फिल्मसिटीत गोळीबार करण्यात आला होता. नानावटी रुग्ण्लायात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवार रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा रात्री दीडच्या सुमारास मृत्यू झाला. गोरेगाव चेकनाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.दरम्यान, शिंदे यांच्या मारेकऱ्यांवर हत्येचे कलम लावण्यात येणार असल्याचे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी शिंदेंवर हल्ल्याप्रकरणी आरे पोलिसांनी कटाचा मुख्य सूत्रधार सुरेश गायकवाड, सुरेश कोकणे, सुमित तळेकर , जुगल दोढीया , संदीप खैरनार , सतीश मोरे आणि जितू धीवर (३२) यांना अटक केली आहे.