मुंबई - देशातील अब्जाधीश गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला आता मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभ्या राहत असलेल्या १४ मजली आलिशान महालात राहणार आहेत. मुंबईतील सुपरपॉश परिसरामध्ये मलबार हिलमध्ये हे आलिशान महालासारखे घर बांधले जात आहे. याच परिसरामध्ये अनेक नामांकित उद्योगपती आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती राहतात. हे घर बांधण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांनी तब्बल ३७१ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती.
राकेश झुनझुनवाला हे ५.७ अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह देशातील ३६ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. झुनझुनवाला हे सध्या आपल्या कुटुंबासह एका अपार्टमेंट ब्लॉकच्या दोन मजली घरामध्ये राहतात. मलबार हिलमध्ये सज्जन जिंदाल, आदी गोदरेज आणि बिर्ला कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर आहे. येथे एक चौरस फुटासाठी १ लाथ रुपयांपेक्षा अधिक दर आहे.
बी.जी. खेर मार्गावर झुनझुनवाला यांच्या १४ मजली मंगल्याच्या निर्मितीचे कार्य वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी भारताच्या अब्जाधीश गुंतवणूकदारांच्या आलिशान बंगल्याची निर्मिती सुरू आहे. तिथे आधी १४ फ्लॅट्स होते. आता राकेश आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी ते ३७१ रुपयांना खरेदी केले होते. ते फ्लॅट्स पाडून आता बंगला बांधण्यात आला आहे. एकूण २७०० चौरस फुटांच्या प्लॉटवर ५७ मीटर उंच इमारत बांधण्यात येणार आहे.
झुनझुनवाला यांच्या नव्या घरामध्ये एका प्लोअरवर बॅक्वेट हॉल, एकावर स्विमिंग पूल, एकावर जिम आणि एकावर होम थिएटर अशा गोष्टी असतील. इमारतीच्या सर्वात उंच मजल्यावर ७०.२४ चौरस किमीचा कंझर्व्हेटिव्ह एरिया, री-हिटींग किचन, पिझ्झा काऊंटर, आऊटडोअर सिटिंगसाठी चांगली जागा, व्हेजिटेबल गार्डन, बाथरूम आणि एक खुला टेरेस असेल.
या इमारतीमधील १२ व्या मजल्यावर मास्टर्स फ्लोअरचे नाव देण्यात आले आहे. येथे राकेश झुनझुनवाला पत्नी रेखा यांच्यासोबत राहतील. या फ्लोअरवर एक मोठा बेडरूम, वेगवेगळे बाथरूम, ड्रेसिंग रूम आणि एक लिव्हिंग रूम असेल. ११ वा मजला हा तिन्ही मुलांसाठी असेल. दोन्ही मुलांसाठी दोन बेडरूम बनवण्यात येत आहेत. दोन बेडरूमसोबत मोठा टेरेसही अॅटॅच असेल. तसेच बाल्कनीही असेल.
चौथा मजला पाहुण्यांसाठी असेल. येथे एल आकाराचे किचन असेल. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मि़ड साइझचे काही रूम, बाथरूम आणि स्टोरेज एरिया असेल. ग्राऊंड फ्लोअरवर तीन पट उंच असलेली लॉबी, एक फॉये आणि एक फुटबॉल कोर्ट बनवण्याची योजना आहे. बेसमेंटला सर्व्हिसेस आणि पार्किंगसाठी ठेवण्यात आले आहेत. पाच सदस्यांच्या या कुटुंबासाठी सात पार्किंग स्लॉट बनवण्यात येत आहेत.