राकेश वाधवानचा अंतरिम जामीन विशेष न्यायालयाकडून नामंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:59 AM2020-04-18T00:59:52+5:302020-04-18T01:00:02+5:30

राकेश वाधवान (६०) याने आपल्या वयाचा आणि त्याला असलेक्या आजारांचा हवाला देत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यालाही होईल, अशी भीती व्यक्त केली

Rakesh Wadhwan's interim bail denied | राकेश वाधवानचा अंतरिम जामीन विशेष न्यायालयाकडून नामंजूर

राकेश वाधवानचा अंतरिम जामीन विशेष न्यायालयाकडून नामंजूर

Next

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या एचडीआयएलचा प्रवर्तक राकेश वाधवान याची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला.

राकेश वाधवान (६०) याने आपल्या वयाचा आणि त्याला असलेक्या आजारांचा हवाला देत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यालाही होईल, अशी भीती व्यक्त केली. याच आधारे त्याने आपली अंतरिम जामिनावर सुटका करण्याची विनंती विशेष न्यायालयाला केली. मात्र त्याची ही विनंती विशेष पीएमएलए न्या. पी. पी. राजवैद्य यांनी नाकारली. एचडाआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग वाधवान हे पीएमसी बँकेच्या ४,३५५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी आहेत. या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयासह मुंबईचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागही करत आहे. दिवाळखोरीत निघालेल्या एचडीआयएलला कोट्यवधी रुपयांचे कर्ज देऊन पीएमसी बँक डबघाईला आली.

येस बँकप्रकरणी एफआयआरच्या प्रतीस नकार
च्येस बँक घोटाळ्याप्रकरणी नोंद झालेल्या एफआयआरची प्रत देण्याची आरोपी कपिल वाधवान व त्याचा भाऊ धीरज वाधवान यांची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली.
च्हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे नसून लॉकडाउन हटविल्यावरही यावर सुनावणी घेऊ शकतो, असे म्हणत न्यायालयाने या प्रकरणांवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. येस बँकचा प्रवर्तक राणा कपूर याचे मनी लाँड्रीग केल्याप्रकरणी सीबीआयने या दोघांचाही नावाचा समावेश आरोपींच्या यादीत केला आहे.

Web Title: Rakesh Wadhwan's interim bail denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.