Join us

सोशल मीडियावर कांस्यपदक विजेत्या साक्षीच्या साथीने रक्षाबंधन व्हायरल

By admin | Published: August 19, 2016 4:08 AM

सणासुदीच्या दिवसात सोशल मीडियावर ‘अपडेट’ करण्यासाठी नेटिजन्स नेहमीच आघाडीवर असतात. रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने मिळविलेल्या कांस्यपदकामुळे

- महेश चेमटे,  मुंबईसणासुदीच्या दिवसात सोशल मीडियावर ‘अपडेट’ करण्यासाठी नेटिजन्स नेहमीच आघाडीवर असतात. रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने मिळविलेल्या कांस्यपदकामुळे रक्षाबंधनाचा उत्साह अधिकच वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर साक्षीच्या साथीने रक्षाबंधन व्हायरल होत होते.तंत्रज्ञानामुळे नेटिजन्समध्ये जागरूकता अधिक वाढली आहे. भावा-बहिणीचे अतूट नाते जपणाऱ्या रक्षाबंधनामुळे बुधवारी रात्री १२च्या ठोक्याला व्हॉट्स अ‍ॅपचे डीपी आणि फेसबुकचे प्रोफाईल फोटोज् बदलण्यास सुरुवात झाली. रिओच्या १२व्या दिवशी (गुरुवारी) महिला कुस्तीत ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्यपदकावर नाव कोरले आणि रात्री ३ वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर साक्षीसाठी शुभेच्छाच्या संदेशांचा वर्षाव सुरू झाला. भाऊ-बहिणींचा सण अर्थात रक्षाबंधन.. त्यात साक्षीचे रिओमधील पहिले पदक... या दुग्धशर्करा योगानंतर नेटिजन्सने आपआपल्या पद्धतीने व्यक्त होण्यास सुरुवात केली. ‘साक्षी, दीपा, सिधंू खरंतर तुम्हाला राखी बांधायला हवी. अब्जोवधीच्या लोकसंख्येत मुलींनीच लाज राखली,’ अशा संदेशांनी मोबाइल सतत खणखणत असल्याचे दिसून आले. फेसबुकवरही पदकासह तिरंगा फडकविताना साक्षीचा फोटो मोठ्या प्रमाणात टॅग होऊन पोस्ट झाला. वीरेंद्र सेहवागने देखील सकाळी ७च्या सुमारास टिष्ट्वटरवरून साक्षीला आपल्या खास शैलीत ‘पुरा भारत इस देश का साक्षी है, जब कोई मुसिबत हो लडकियाँ ही मालिक है...’असे टिष्ट्वट केले. वीरूच्या टिष्ट्वटनंतर काही मिनिटांत नेटिजन्समध्ये रिटिष्ट्वट करण्यासाठी चढाओढ दिसून आली; शिवाय व्हॉट्स अ‍ॅपच्या काही ग्रुपमध्ये चक्क साक्षीचा डीपी ठेवण्यात येऊन नेटिजन्सने तिचे आभार मानले. वीरू अन् शहेनशाहची शाबासकी...मैदानावर गोलंदाजांची झोप उडविणाऱ्या वीरेंद्र सेहवागने चक्क टिष्ट्वटरच्या आॅनलाइन पट्टीवर चोख स्ट्रेट ड्राइव्ह खेचत नेटिजन्सची मने जिंकली. रिओपदकवीर साक्षीच्या विजयात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात नेटिजन्स साजरे करीत असतानाच वीरूने ‘साक्षी मलिक के गले में मेडल कितना शोभा दे रहा है.. हॅपी रक्षाबंधन!’ असे टिष्ट्वट केले. या टिष्ट्वटनंतर काही मिनिटांत हजारो रिटिष्ट्वट करण्यात आले, दस्तुरखुद्द शहेनशाह अमिताभ बच्चन यांनीही ‘हा..हा..हा.. वीरूजी आपके सेन्स आॅफ ह्युमर ने एक और सिक्सर मार दिया स्टेडिअम के बाहर’ असे रिटिष्ट्वट केले.