Join us

रक्तवीर लेलेकाकांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

मुंबई : ६३व्या वर्षीही रक्तदानाचे व्रत अखंड ठेवून तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण करणाऱ्या बोरीवलीतील लेले काका अर्थात विश्वेश लेले ...

मुंबई : ६३व्या वर्षीही रक्तदानाचे व्रत अखंड ठेवून तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण करणाऱ्या बोरीवलीतील लेले काका अर्थात विश्वेश लेले यांच्या कार्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली आहे. सर्वाधिक रक्तदान करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी ही अनोखी भेट मिळाल्याने लेले यांना सुखद धक्का बसला. लोकमतने ३ मे रोजी त्यांच्या कार्याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. लेलेकाकांचा रक्तदानासाठीचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. कोरोनाकाळातही त्यांनी चारवेळा रक्तदान केले आहे. अठराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. तरुणवयात ते दीड महिन्याच्या फरकाने रक्त द्यायचे. आता वयपरत्वे मर्यादा आल्यामुळे वर्षातून किमान तीन-चार वेळा तरी रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

वैयक्तिकरीत्या सर्वाधिक वेळा रक्तदान करणारी व्यक्ती म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांचा सन्मान केला आहे. पदक, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह अशी अनोखी भेट वाढदिवसाच्या दिवशीच मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

.....

(फोटो – विश्वेश लेले)