कुठे दुरंगी, कुठे तिरंगी लढत! ठिकठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांचे रॅली काढून शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:46 AM2024-10-30T11:46:01+5:302024-10-30T11:47:06+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ मंगळवारी दुपारी तीन वाजता संपली.

rallies of all party candidates at various places in mumbai | कुठे दुरंगी, कुठे तिरंगी लढत! ठिकठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांचे रॅली काढून शक्तिप्रदर्शन

कुठे दुरंगी, कुठे तिरंगी लढत! ठिकठिकाणी सर्वपक्षीय उमेदवारांचे रॅली काढून शक्तिप्रदर्शन

मुंबई :

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ मंगळवारी दुपारी तीन वाजता संपली. मंगळवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरले. मुंबईत कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सहा ते सात ठिकाणी सर्व पक्षांनी उमेदवार ऐनवेळी जाहीर केल्याने त्या मतदारसंघांत इतरांनीही अर्ज भरले आहेत. मात्र, माघारीनंतर तेथील चित्र स्पष्ट होईल.
शिंदेसेनेचे खा. मिलिंद देवरा यांनी वरळीतून अर्ज भरला आहे. त्यामुळे येथे उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत होणार आहे, तर मुंबादेवीमध्ये भाजपच्या शायना एन. सी आणि काँग्रेसचे आ. अमीन पटेल अशी दुहेरी लढत होत आहे.

बोरिवलीमध्ये भाजपचे संजय उपाध्याय यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, आ. सुनील राणे, आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे भाजपचा अधिकृत उमेदवार विरुद्ध बंडखोर अशी लढत होणार आहे.

अजित पवार गटाचे आ. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजप व शिंदेसेनेने विरोध केला होता. त्यामुळे अधिकृत यादीत त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र, वेळ संपण्यापूर्वीच त्यांनी शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून अजित पवार गटाच्या एबी फॉर्मसह अर्ज भरला.

मंगळवारी या उमेदवारांनी भरले अर्ज 
मतदार संघ     उमदेवार    पक्ष
वरळी     मिलिंद देवरा     शिंदेसेना
चेंबूर     तुकाराम काते    शिंदेसेना 
भांडुप     अशोक पाटील    शिंदेसेना 
विक्रोळी     सुवर्णा कारंजे    शिंदेसेना 
दिंडोशी     संजय निरुपम    शिंदेसेना 
मुंबादेवी     शायना एन सी    शिंदेसेना 
माहीम     सदा सरवणकर    शिंदेसेना 
धारावी     राजेश खंदारे    शिंदेसेना 
वांद्रे पूर्व     कुणाल सरमळकर    शिंदेसेना -(अपक्ष)
दहिसर     विनोद घोसाळकर    उद्धवसेना 
वर्सोवा     हारून खान    उद्धवसेना 
घाटकोपर प.     संजय भालेराव    उद्धवसेना 
मुंबादेवी     अमीन पटेल    काँग्रेस 
कुलाबा     हिरा देवासि    काँग्रेस
मुलुंड     राकेश शेट्टी    काँग्रेस
घाटकोपर पूर्व     पराग शहा    भाजप 
वर्सोवा     डॉ. भारती लव्हेकर    भाजप
विलेपार्ले     जुईली शेंडे    मनसे
वांद्रे पूर्व     तृप्ती सावंत    मनसे
मानखुर्द शि. नगर     नवाब मलिक     अजित पवार गट 
मुलुंड     संगीता वाजे     शरद पवार गट 
भायखळा     सईद खान     समाजवादी पक्ष
बाेरिवली     गाेपाळ शेट्टी     भाजप (बंडखाेर)
मुंबादेवी     अतुल शाह     भाजप (बंडखाेर)
अंधेरी पूर्व     कृतिका शर्मा    शिंदेसेना (बंडखाेर) 
वर्साेवा     चंगेज मुलतानी     काॅंग्रेस (बंडखाेर) 
 

Web Title: rallies of all party candidates at various places in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.