राम कदमांची संजय राऊतांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:41 AM2020-01-16T10:41:51+5:302020-01-16T11:25:46+5:30
मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरून उफाळून आलेला वाद आता थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतरही आमदार राम कदम सकाळपासून घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही राम कदमांनी दिला आहे. त्यामुळे संजय राऊतांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचा भाजपाकडून प्रयत्न होत आहे. दुसरीकडे मंगळवेढ्यात राऊतांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरमधल्या संगमनेरमध्येही उदयनराजे समर्थकांनी राऊतांविरोधात निषेध नोंदवला आहे.
तत्पूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असं आव्हानच केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी जनतेने दिली आहे. रक्षणकर्ता राजा असतो, लुटणारा राजा नसतो, असाही चिमटा त्यांनी काढला होता.
काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरुही हिंदुत्ववादीच ; संजय राऊत यांनी सांगितलं 'लॉजिक'
'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'
तर उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करावे, असे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले होते की, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि आम्ही त्यांना दैवत मानतो. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
'आमचे सरकार म्हणजे ‘सुपरहिट’ सिनेमा; मी कोणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर या'
नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...
आम्ही कुठल्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्र जाणतो - शिवेंद्रराजे भोसले
‘आम्ही कुठल्या घराण्यात जन्माला आलो, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊतांना याचा काय पुरावा पाहिजे,’ असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राऊतांना काय पुरावा पाहिजे, हे त्यांनी सांगावे. वाद त्यांनीच सुरू केला आहे. मी काय किंवा उदयनराजे, संभाजीराजेही यावर कधी बोलले नव्हते. छत्रपतींच्या घराण्यात जन्मल्याचा पुरावा आम्ही काय द्यायचा. कोण कुठल्या घरात जन्मलंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता हा वाद संपवायचा कसा हे राऊतांनी सांगावं.
BJP leader Ram Kadam on Sanjay Raut's reported comment, 'Udayanraje Bhosale must prove that he is a descendant of Chhatrapati Shivaji Maharaj': He must take back his statement. We demand that a case must be registered against him and he must be arrested. pic.twitter.com/eEXzNEDZig
— ANI (@ANI) January 16, 2020