कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 01:05 PM2020-06-19T13:05:06+5:302020-06-19T13:05:14+5:30

गणेशोत्सवापाठोपाठ दहीहंडीबाबत ही आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ram Kadam's important decision regarding Dahi Handi in Corona crisis | कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

कोरोना संकटात राम कदम यांचा दहीहंडीबाबत महत्त्वाचा निर्णय

Next

मुंबई - देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच लोकांना गर्दी न करण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना यंदा सणांवरही कोरोनाचं सावट आलं आहे. 

गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र आता कोरोनामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवापाठोपाठ दहीहंडीबाबत ही आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. कोरोनाचं संकट पाहता लोकांची गर्दी टाळण्यासाठी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम कदम यांनी शुक्रवारी (19 जून) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

#corona चे संकट पाहता आणि #दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता #घाटकोपरला होणारी आमची देशातील #सर्वातमोठी #दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे #krishnajanmashtami" असं ट्विट केलं आहे. दरवर्षी राम कदम घाटकोपर परिसरात मोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. हजारोंच्या संख्येत गोविंदा आणि लोक उपस्थित असतात. त्यामुळे यंदा जनतेच्या हिताचा विचार करून दहीहंडीचं आयोजन न करण्याचा राम कदम यांनी निर्णय घेतला आहे. 

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 13,586 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 12,573 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,80,532 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात बारा हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या

हत्या की आत्महत्या? पुण्यापाठोपाठ 'या' शहरात 6 जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका

Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक

Read in English

Web Title: Ram Kadam's important decision regarding Dahi Handi in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.