राम कदमांची नवी 'ऑफर'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:41 PM2018-10-13T16:41:01+5:302018-10-13T16:50:45+5:30
राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांच्या मतदारसंघातील तरुणांना आणि ज्यांची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत,
मुंबई - भाजप आमदार राम कदम आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी चक्क व्हिडीओच्या माध्यमातून राम कदम यांनी आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. राम कदम यांचा नवीन प्रताप, असे कॅप्शनही आव्हाड यांनी या आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लिहिले आहे.
राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांच्या मतदारसंघातील तरुणांना आणि ज्यांची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केलं आहे. त्यावेळी बोलताना राम कदम यांनी मतदारयादीत नाव नोंदवणारांना तिरुपतीच्या दर्शनाला नेणार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम कदमांचा व्हिडीओ शेअर करुन जाब विचारला आहे. तुम्ही नवीन मतदार नोदणी करा व माझ्या कार्यालयाला कळवा...तिरूपती यात्रा, लोकप्रिय अभिनेत्यांसोबत फोटो काढून देणार, महागड्या गाड्यामध्ये फिरवणार असे राम कदम आत्ताच विचारत आहेत. जर मतदार होण्यासाठी आमिष दाखविण्यात येतयं. तर, मग निवडून येण्यासाठी... असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
भाजपा आमदार राम कदम यांचा नवीन प्रताप..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2018
तुम्ही नवीन मतदार नोदणी करा व माझ्या कार्यालयाला कळवा...तिरूपती यात्रा , लोकप्रिय अभिनेत्यांसोबत फोटो काढून देणार , महागड्या गाड्या मध्ये फिरवणार 😳...
आमिष मतदारांना मतदार होण्यासाठी मग निवडुन येण्यासाठी.. pic.twitter.com/Yu4WsGvE8d