Join us  

सोशल मीडियावरही रामराज्य! सातासमुद्रापार पोहोचली अयोध्येची भव्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 9:37 AM

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर सोशल मीडियावरही केवळ रामराज्य दिसून येत आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर सोशल मीडियावरही केवळ रामराज्य दिसून येत आहे. अनेक नेटीझन्सने अयोध्या येथील रामलल्लांची मूर्ती आपल्या डीपी, स्टेट्स, प्रोफाईलवर ठेवली आहे. याखेरीस, सोशल मीडियावर पहिल्यांदाच  ‘एकमेव रविवार असा आहे की, सर्वजण सोमवारची वाट पाहत आहोत, अशा आशयाचे अनेक संदेश समाजमाध्यमांवर झळकत असल्याचे दिसत आहे.  

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात होणाऱ्या राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सोहळ्यानंतर आता रामभक्तीत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, नेपाळसह जगभरातील अनेक देशांमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे. त्यात आता फ्रान्समधूनही रामभक्तांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत श्रीरामाचे बॅनर अन् फुलांनी सजवलेल्या टेम्पोमध्ये रामभक्त उभे राहून श्रीरामाचा जयजयकार करीत आहेत. यावेळी फ्रान्सच्या रस्त्यांवरही अनेक भारतीय हातात श्रीरामाच्या घोषणांचे झेंडे घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. 

कडाक्याच्या थंडीतही लोक स्वेटर, कॅप घालून रॅलीचा आनंद घेत आहेत. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या परिसरात अयोध्येप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  

  पश्चिम बंगालच्या सिलीगुडीतील एका कलाकाराने अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे चित्र आपल्या नखावर रेखाटले आहे, रमेश शहा हे एक मायक्रो आर्टिस्ट आहेत, जे अतिशय लहान आकाराची चित्रे बनवण्यासाठी ओळखले जातात. 

  गुजरातचे सिद्धार्थ दोशी कारला पिवळा आणि भगवा रंग दिला आहे. गाडीवर संस्कृतमधील श्लोक, प्रभू श्रीरामांचे फोटो, मंदिराची प्रतिकृती आणि मनमोहक पणत्या, असा खास साज दिला आहे.

‘रामसेतू’ करतो प्रेम, आपुलकीचे प्रतिनिधित्व :

तर दुसरीकडे ‘स्टोरीज ऑफ भारत’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओत राम लिहिलेला दगड पाण्यावर तरंगत असल्याचा दिसतोय. हा रामसेतूचा दगड असल्याचे म्हटले जाते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, रामसेतू हा पूल मात्र सीतेसाठी प्रभू रामाचे कधीही न संपणारे प्रेम आणि आपुलकीचे प्रतिनिधित्व करतो. या पोस्टमध्ये राम मंदिराचे क्लासिक डूडल शेअर करण्यात आले असून, अमूल गर्ल राम मंदिर सोहळ्यात सहभागी होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. फोटोत अमूल मुलगी राम मंदिरासमोर अनवाणी हात जोडून उभी आहे.

पायलटची कविता व्हायरल :

एका पायलटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायलटने प्रभू राम यांच्यावर एक कविता ऐकवत आहे, ज्यामध्ये प्रभू राम कोणाच्या घरी येतील हे सांगत आहे. विमानातील प्रवाशांना भगवान श्रीरामांबाबत एक कविता ऐकवत आहे. ज्यामध्ये ते सांगत आहे की, एकही तो राम हैं किस किस के घर जाएंगे?  याच प्रश्नाचे उत्तर पायलटने आपल्या कवितेतून दिले आहे. या व्हिडीओलाही खूप पसंती मिळत आहे.

टॅग्स :राम मंदिरअयोध्यासोशल व्हायरल