मुंबई - ज्या नावाने जोगेश्वरी आणि गोरेगाव मध्ये राम मंदिर रोड स्टेशनचे उद्घाटन दि,22 डिसेंबर 2016 माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केले होते. राम मंदिर रेल्वे स्थानका जवळ 450 वर्षां पूवीचे राम मंदिर आहे.या मंदिराचे स्वरूप शके 1819 सलाचे आहे.हरिश्चंद्र गोरेगावकर मुंबईच्या नामांकित व्यक्तीमत्वानी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. श्री राम मंदिर देवस्थान ही संस्था स्थापन केली. येथे सर्वप्रथम 1996 मध्ये राम नवमी उत्सव सुरू झाला अशी माहिती येथील वेदमूर्ती प्रथमेश बर्डे गुरुजीयांनी दिली.
आज सकाळी 6.30 वाजता मंदिर उघडले,8 अभिषेक,देवाला सोने चांदी अलंकाराने सजवले गेले,सकाळी 11 वाजता कीर्तन सेवा व दुपारी 12 वाजता येथे राम जन्म झाला.भक्तांना लाडू व सुठवडा दिला गेला.आज दिवसभर भक्तांनी येथे गर्दी केली होती.
मंदिरात भक्तांच्या साठी फक्त राम नवमीला मंदिराचा गाभारा खुला केला जातो,तर 364 दिवस गाभाऱ्यात फक्त गुरुजींना प्रवेश असतो अशी माहिती प्रथमेश बर्डे गुरुजी यांनी दिली.