Join us

‘राम मंदिर विरोध म्हणजेच राष्ट्रविरोध’

By admin | Published: April 01, 2017 6:44 AM

राम मंदिराला विरोध करणारे सेक्युलर मुस्लीम हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री

मुंबई : राम मंदिराला विरोध करणारे सेक्युलर मुस्लीम हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी केला आहे. भव्य राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा मंजूर करावा, अशी मागणीही जैन यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.जैन म्हणाले की, संबंधित जागेवर राम मंदिर असल्याचे पुरावे या आधीच समोर आले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर, निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने चर्चेचा मार्ग सुचविला होता. मात्र, स्वत:ला सेक्युलर म्हणवणाऱ्या काही मुस्लीम संघटनांनी चर्चेची दारे बंद ठेवली. त्यामुळे शेवटचा मार्ग म्हणून हिंदू समाजातर्फे देशात ५ हजार सभांद्वारे जनजागरण करण्यात येणार आहे. सोबतच शोभायात्रा आणि ग्रामसभा घेतल्या जातील, त्यामधून निर्माण होणाऱ्या वातावरणाला कोणतीही संघटना किंवा व्यक्ती विरोध करू शकणार नाही. तरी या वर्षी सर्व हिंदू बांधवांना भव्य राम मंदिर निर्मितीची गोड बातमी नक्कीच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुलामीचे प्रतीक असलेल्या वास्तू पाडण्याचा इतिहास देशाला नवा नसल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. त्यासाठी जैन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी उभारलेल्या सोमनाथ मंदिराचा दाखला दिला. शिवाय दिल्लीतील इंडिया गेट येथील राणी व्हिक्टोरियाचा पुतळा हटवून त्या ठिकाणी उभारलेला महात्मा गांधी यांचा पुतळा आणि देशातील विविध रस्ते आणि रुग्णालयांची बदलण्यात आलेल्या नावांचे दाखले दिले. वादग्रस्त जागेवरही राजा बाबरने लढाई जिंकल्यानंतर उभारलेला विजयस्तंभ होता. मात्र, बाबर समर्थकांकडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी संबंधित जागेवर राम मंदिर उभारण्याला विरोध होत आहे. त्यामुळे राम मंदिराला विरोध करणारे तथाकथित सेक्युलर मुस्लीम हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोपही जैन यांनी केला. (प्रतिनिधी)रुग्णालय उभाराराम मंदिर -बाबरी मशीद कृती समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, या जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन तोडगा काढण्याची मागणी पंतप्रधानांना केली आहे.दिल्लीतील इंडिया गेट येथील राणी व्हिक्टोरियाचा पुतळा हटवून त्या ठिकाणी उभारलेला महात्मा गांधी यांचा पुतळा आणि देशातील विविध रस्ते आणि रुग्णालयांची बदलण्यात आलेल्या नावांचे दाखले दिले. वादग्रस्त जागेवरही राजा बाबरने लढाई जिंकल्यानंतर उभारलेला विजयस्तंभ होता. बाबर समर्थकांकडून प्रसिद्धी मिळवण्यासाठी संबंधित जागेवर मंदिर उभारण्याला विरोध होता.