Join us

रमजानचे रोजे आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 5:57 AM

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या पवित्र महिन्याच्या सार्वजनिक उत्साहाला खीळ बसली असून सर्व विधी घरीच पार पाडायच्या आहेत.​​​​​​​

मुंबई : मुस्लीम धर्मात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानचे रोजे (उपवास ) शनिवारपासून सुरू होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या पवित्र महिन्याच्या सार्वजनिक उत्साहाला खीळ बसली असून सर्व विधी घरीच पार पाडायच्या आहेत.शुक्रवारी काही ठिकाणी चंद्र दर्शन झाले आणि सौदी अरेबियात पहिला रोजा पार पडला. त्यामुळे आज रात्री पहिली तराबीह आणि शनिवारपासून रोजे करण्याचा निर्णय हिलाल कमिटीने घेतल्याचे सांगण्यात आले. या कालावधीत नमाज, रोजा सोडणे (इफ्तारी), कुराण पठण आणि या महिन्यातील रात्रीची विशिष्ट नमाज (तरावीह) ही सर्व कर्तव्ये मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरातच करावी, घराबाहेर पडू नये, असे आवाहन राज्य सरकार, पोलिसांसह उलेमा कमिटी, जमाते ए इस्लामी, रझा अकादमी आदी संघटनांनीही केले आहे.तर कोरोना विषाणूच्या विरुद्ध आपण सर्वजण लढा देत आहोत. या लढाईत विजयी होण्यासाठी लॉकडाउन काळात नियम पाळणे गरजेचे आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदीत आजान होईल, मात्र मशिदीत अथवा रस्त्यावर एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.पोलिसांची करडी नजरटाळेबंदीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नेमली आहेत. डोंगरी, महंमद अली रोड, पायधुनी आदी परिसरात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मुस्लीम बांधवानी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले.

टॅग्स :रमजान