सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, रामदास आठवलेंचे शिष्टमंडळाला आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:46 PM2021-03-19T18:46:18+5:302021-03-19T18:47:29+5:30

Union minister Ramdas Athavale : वेळ पडली तर हक्काच्या घरासाठी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांनी आंदोलन छेडावे, त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा सक्रीय पूर्ण पाठिंबा राहिल ,असे रामदास आठवले यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला सुचविले.

Ramdas Athavale assures the delegation that he will meet the Chief Minister for the rightful home of the BMC's clean-up staff | सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, रामदास आठवलेंचे शिष्टमंडळाला आश्वासन 

सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, रामदास आठवलेंचे शिष्टमंडळाला आश्वासन 

Next
ठळक मुद्दे"मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर मिळावे, यासाठी आपण नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. याबाबत लवकरच मुंबई मनपा आयुक्तांना स्मरणपत्र पाठविणार आहोत."

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे मालकी हक्काचे घर मिळावे, यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व जयश्री खाडिलकर-पांडे यांनी केले. यावेळी जयश्री खाडिलकर यांनी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांच्या घराबाबत मुंबई मनपा प्रशासनाने घुमजाव केले असल्याची बाब रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करण्याबाबत विनंती केली. (Union minister Ramdas Athavale assures the delegation that he will meet the Chief Minister for the rightful home of the BMC's clean-up staff) 

डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून मुंबई मनपामध्ये  25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना त्यांच्या मालकी हक्काचे घर देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. तत्कालीन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये या योजनेतून 50 सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर दिले गेले आहे. या योजनेतून उल्हासनगर आणि धुळे मनपामध्ये ही सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर दिले गेले आहे. मात्र मुंबई मनपा सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून घर देण्यास नकार देत आहे. या योजनेतून सफाई कामगारांना घर देणे, मुंबई मनपावर बंधनकारक असताना जागा नाही, अशी सबब देऊन मुंबई मनपाने सफाई कामगारांना घर देण्याच्या शब्दापासून घुमजाव केल्याची माहिती जयश्री खाडिलकर यांनी रामदास आठवले यांनी दिली.

मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आपला निर्धार असून वेळ पडली तर हक्काच्या घरासाठी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांनी आंदोलन छेडावे, त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा सक्रीय पूर्ण पाठिंबा राहिल ,असे रामदास आठवले यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला सुचविले. तसेच, मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर मिळावे, यासाठी आपण नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेतली होती. याबाबत लवकरच मुंबई मनपा आयुक्तांना स्मरणपत्र पाठविणार आहोत. तसेच मुंबई मनपाच्या सफाई कामगारांना एसआरए आणि एमएमआरडीएमार्फत राज्य सरकार ने घरे द्यावीत, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ, असे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले.

Web Title: Ramdas Athavale assures the delegation that he will meet the Chief Minister for the rightful home of the BMC's clean-up staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.