'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:09 PM2022-10-02T18:09:53+5:302022-10-02T18:10:22+5:30

दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे.

Ramdas Kadam has stated that he is sad for that Shiv Sena's Dussehra gathering will be held in two places this year. | 'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

'बाळासाहेबांचा फोटो अन् भगवे झेंडे, दु:ख होतंय'; रामदास कदम यांच्या विधानाची रंगली चर्चा

Next

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 

दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. दोन मेळावे होत आहेत, त्यामुळे आपण समाधानी नाही. दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. आम्ही पक्ष उभा केलाय. अंगावर अनेक केसेस घेतल्या आहेत. पक्षासाठी सगळं भोगलंय. त्यामुळे मला खूप दु:ख होतंय, असं रामदास कदम म्हणाले. 

'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान

शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख वाटतंय, अशी खंत रामदास कदम यांनी बोलावून दाखवली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे निर्णय घेताय की ते मागच्या अडीच वर्षात होऊ शकले नाहीत, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला आहे.

दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या शिवसेनेत प्रवेश करताय. सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन झालेलं आहे, अशा लोकांच्या भावना आहेत. आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय. त्यामुळे आमचा दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

'शिवसेना आमचीच... यंदाचा दसरा मेळावा माझ्या जीवनातील सर्वात मोठा कार्यक्रम'

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Ramdas Kadam has stated that he is sad for that Shiv Sena's Dussehra gathering will be held in two places this year.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.