रामदेवबाबा 'राष्ट्रपुरुष'; भाजपा मंत्र्याच्या विधानावरून विरोधक खवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 01:44 PM2018-03-23T13:44:58+5:302018-03-23T13:44:58+5:30
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव यांना राष्ट्रपुरुष संबोधलं आहे. त्यांनी योग क्षेत्रात देशाचा नावलौकिक वाढवला आहे.
मुंबई- अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव यांना राष्ट्रपुरुष संबोधलं आहे. त्यांनी योग क्षेत्रात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रामदेवबाबा हे हे राष्ट्रपुरुष आहेत, असंही गिरीश बापट म्हणाले आहेत.
काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सरकार रामदेवबाबांना महत्त्वाचं स्थान का देत आहे, असा प्रश्न विचारला होता. संजय दत्त यांच्या आरोपांना अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनीही उत्तर दिलं आहे. रामदेवबाबांनी योग क्षेत्रात देशाचे नाव उंचावलं आहे. रामदेवबाबा राष्ट्रपुरुष तर आहेत. योग आणि स्वदेशी उत्पादनात क्रांती घडवणाऱ्या रामदेवबाबांविषयी विरोधी पक्षाच्या आमदारांनी अशी टीका करणे योग्य नसल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले आहेत.
तसेच सरकारच्या आपले सरकार या वेबसाइटवर पतंजली कंपनीची उत्पादने का विकली जात आहेत, सरकारी संकेतस्थळावर खासगी कंपनीला स्थान का, अन्य कंपन्यांना अशी सुविधा का नाही, असा प्रश्न संजय दत्त यांनी विचारला होता. तसेच ‘मिहान’मध्ये रामदेवबाबा यांच्या कंपनीला कवडीमोल किंमतीत जागा देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.