लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रामदेवबाबा यांनी महिलांबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु त्यांना हे विधान योग्यपणे मांडता आले नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने तसेच अधिक सभ्यपणे आपली भूमिका मांडता आली असती, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तसेच गायिका अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
येथील लोकमत कार्यालयाला त्यांनी रविवारी भेट दिली. यावेळी आयोजित संवादावेळी त्या म्हणाल्या की, केवळ एक वाक्य बाबा रामदेव व्यवस्थित मांडता आले नाही. नेमक्या याच वाक्यावरून गोंधळ निर्माण झाला. देवेंद्र फडणवीस हे प्रतिभावान नेते आहेत. त्यांना केंद्रात स्थान मिळू शकते, असे म्हटले जाते. मात्र, महाराष्ट्राला त्यांच्यासारखा प्रतिभावान नेता हवा आहे, असे त्या म्हणाल्या.
पूर्ण वेळ देणे शक्य होईल तेव्हाच येईन राजकारणातराजकीय नेत्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. सक्रिय राजकारणात येण्यासाठी पूर्ण वेळ देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या काम, समाजसेवा, मुलीला वेळ देणे, गायन यामुळे बरेच व्यग्र राहावे लागते. त्यामुळे जेव्हा आपण राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ, असे वाटेल तेव्हाच सक्रिय राजकारणात येण्याचा विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.