मुंबई - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, यवतमाळ तर्फे यंदाचा आंबेडकर पूर्व कालखंडातील "आद्य समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर जीवन गौरव पुरस्कार " मुंबईतील डॉ.आंबेडकरांच्या दुर्मिळ साहित्याचे संग्राहक, अभ्यासक व गोरेगावचे रहिवासी असलेले रमेश शिंदे आणि डाव्या, पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांना घोषित करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार सोहळा रविवार दि,१ ऑक्टोबर रोजी, दुपारी १२ वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, चौक, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व आंबेडकरी विचारवंत अँड. जयदेव गायकवाड, डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग सेंटर (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे व इतिहास अभ्यासक डॉ श्रद्धा कुंभोजकर या उपस्थित राहणार आहेत, असे गोपाळबाबा वलंगकर जीवन गौरव पुरस्कार समितीचे डॉ प्रेम हनवते यांनी कळवले आहे.