रामनाथ मोते, बीजवार यांची परिषदेतून हकालपट्टी !
By admin | Published: January 25, 2017 03:04 AM2017-01-25T03:04:44+5:302017-01-25T03:04:44+5:30
शिक्षक परिषदेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे, प्रचार करणे, तसेच संघटनेविरोधात काम करण्याचा ठपका ठेवत,
मुंबई : शिक्षक परिषदेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे, प्रचार करणे, तसेच संघटनेविरोधात काम करण्याचा ठपका ठेवत, शिक्षक परिषदेने दोन वेळा आमदार असलेल्या रामनाथ मोतेंसह शेषराव बीजवार आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगळवारी संघटनेतून हकालपट्टी केली.
पुण्यात पार पडलेल्या शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक परिषदेचे राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी याबाबतची घोषणा केली. या बैठकीला शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष भगवान साळुंखे यांच्यासह संजीवनी रायकर, बाबासाहेब काळे, सुनील पंडित यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. कोकण, नागपूर व औरंगाबाद विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. वातकर यांनी सांगितले की, या निवडणुकीत शिक्षक परिषदेने कोकण विभागातून शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, नागपूर मधून माजी आमदार नागो गाणार व औरंगाबादमधून सतीश पत्कींना उमेदवारी दिली आहे.
शिक्षक परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षे आमदारकी उपभोगल्यावरही मोते यांना तिसऱ्यांदा उमेदवारी हवी होती. (प्रतिनिधी)