मुंबई : जूनअखेरीस मुंबईत दाखल होणाऱ्या मान्सूनने आपला या महिन्यातील बॅकलॉग भरून काढला आहे. तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार बँटिंग सुरू असल्याने गेल्या तीन दिवसांत आठ दिवसांचा जलसाठा वाढला आहे.गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे तलाव क्षेत्रात ९१ टक्केच जलसाठा जमा झाला. यामुळे १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात पालिकेने लागू केली.दरम्यान, सलग तीन दिवस मुंबईबरोबरच ठाणे जिल्ह्यातील तलाव क्षेत्रातही पाऊस बरसत आहे. यामुळे जलसाठ्यात वाढ असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.१७ हजार दशलक्ष लीटरने वाढला जलसाठातलावांमधील जलसाठा ३१ जुलैपर्यंत मुंबईला पुरेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पाऊस असाच बरसत राहिल्यास या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास जल अभियंता खात्याला आहे.रविवार सकाळपासून सोमवार सकाळपर्यंत तलावांमध्ये १७ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो.तलावांमधील जलसाठावर्ष जलसाठा टक्के२०१९ १०४४९६ ७.२२२०१८ ३०३२७८ २०.९५२०१७ ४९२०२२ ३३.९९(दशलक्ष लीटर)
तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; ७२ तासांत वाढला आठ दिवसांचा जलसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:46 AM