तलाव क्षेत्रातही पावसाची जोरदार बॅटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:08 AM2018-07-08T06:08:17+5:302018-07-08T06:08:42+5:30
पावसाळ्यात महत्वाचा काळ ठरणाऱ्या जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रातही जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे.
मुंबई : पावसाळ्यात महत्वाचा काळ ठरणाऱ्या जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रातही जोरदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. गेले दोन दिवस कोसळणाºया मुसळधार पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढत आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा अद्याप १५ टक्के कमी आहे.
गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन मिटले होते. मात्र यावर्षी मान्सूनच्या पहिल्याच म्हणजे जून महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात एखादा दिवस वगळता तुरळक हजेरी लावली. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पुढील दोन महिने महत्वाचे ठरणार आहेत. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सलग हजेरी लावणाºया पावसाने पाण्याचे टेन्शन निवळण्याचे संकेत दिले आहेत.
तलावांमध्ये आजच्या घडीला ३१ टक्के जलसाठा आहे. गेल्या चार दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे तलावांत पाण्याची पातळी वाढली. मात्र गेल्यावर्षी याच दरम्यान तलावांमध्ये ४५ टक्के जलसाठा जमा झाला होता.