सातारा : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निबांळकरांना मी सांगितलं होतं की, माझ्या नादाला लागू नका. तरीही त्यांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनाच हातात कटोरा घेऊन फिरावं लागत आहे, अशी टीका माण-खटावचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी शनिवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली. सोलापूर येथे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, मी कायमच बारामती व फलटणकरांच्या टार्गेटवर राहिलो आहे. रामराजेंनाही अनेकदा माझ्या नादाला लागू, असं बजावलं होतं. रावण सीतेच्या नादाला लागला अन् अडचणीत आला, त्याच्याप्रमाणेच रामराजेंनाही आता हातात कटोरा घेऊन फिरावं लागत आहे. मी सन्मानानं भाजपमध्ये जाणार असून, रामराजे अद्यापही यादीबाहेरच आहेत.माण-खटावचा दुष्काळ हटविण्यासाठी जो शब्द मी मागितला, तो प्रत्येक शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळला, याचा आनंद आहे. बंधू शेखर गोरे यांच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांचे टायमिंग नेहमीच चुकते, आताही चुकले आहे, अशी टिपण्णीही गोरे यांनी केली.बाबांसाठी एकलव्याप्रमाणे काम केलेपृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मी त्याग करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ताकद वाढविण्यासाठी मी अनेकांना अंगावर घेतले. त्यांचं माझ्यावर किती प्रेम होतं ते मला माहीत नाही; परंतु मी एकलव्याप्रमाणे काम केलं, असे ते म्हणाले.