राज्यात हनुमान चालीसावरून तापलेलं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही भागात भोंग्यावरून हनुमान चालीसा लावली. मात्र त्या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले आणि त्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांना खार पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असून त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.
आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्री बाहेर जमा झाले. राणा दाम्पत्याने शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. मात्र आपण गनिमी काव्याने मातोश्रीवर येणारच असं रवी राणा यांनी म्हटलं होते. त्यामुळे शिवसैनिक पुन्हा मातोश्री जमा होण्यास सुरूवात झाली असून त्यांनी राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.
राणा दाम्पत्य खार येथील आश्रमगृहात दाखल झाले असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आक्रमक झालेले शिवसैनिक जमा झाले आहेत. रवी राणा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच मातोश्रीबाहेर कडेकोट बंदोबस्त दाखल आहे. दाखल झाले असून त्यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आक्रमक झालेले शिवसैनिक जमा झाले आहेत. रवी राणा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच मातोश्रीबाहेर कडेकोट बंदोबस्त दाखल आहे.