रणदीप हुडा अग्निशमन दलाचा ‘चेहरा’

By admin | Published: April 12, 2016 01:44 AM2016-04-12T01:44:43+5:302016-04-12T01:44:43+5:30

जिवाची पर्वा न करता आगीत उडी घेऊन मुंबईकरांचे प्राण वाचविणारे अग्निशमन दलाचे जवान म्हणजे खरे आदर्शच़ मात्र, ही जोखीम पत्करून या दलामध्ये प्रवेश घेणारे कमीच आहेत़ तरुणांना स्वेच्छेने

Randeep Hooda firefighters 'face' | रणदीप हुडा अग्निशमन दलाचा ‘चेहरा’

रणदीप हुडा अग्निशमन दलाचा ‘चेहरा’

Next

मुंबई : जिवाची पर्वा न करता आगीत उडी घेऊन मुंबईकरांचे प्राण वाचविणारे अग्निशमन दलाचे जवान म्हणजे खरे आदर्शच़ मात्र, ही जोखीम पत्करून या दलामध्ये प्रवेश घेणारे कमीच आहेत़ तरुणांना स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून या दलात येण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे़ त्यानुसार, प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा आता अग्निशमन दलाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार आहे़
अग्निशमन दलाच्या ताफ्यात आजच्या घडीला जवान व अधिकारी मिळून सुमारे तीन हजारांचा ताफा आहे़ मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना वाढत असल्याने हा ताफा अत्यंत तोकडा पडत आहे़ यामुळे सध्या ताफ्यात असलेल्या जवानांवरही ताण वाढतो आहे़ म्हणूनच जास्तीत जास्त तरुणांना अग्निशमन दलाकडे आकर्षित करण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडरचा शोध गेले अनेक दिवस सुरू होता़ अखेर सध्या गाजत असलेला रणदीप हुडा याच्याशी संपर्क करण्यात आला़ १४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताहात रणदीप कॅम्पेनला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या सात हजारांवरून ७० हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे़ या वृत्ताला अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनीही दुजोरा दिला आहे़ (प्रतिनिधी)

अग्निशमन सप्ताहात जनजागृती
१४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताह असल्याने गुरुवारपासून रणदीप कॅम्पेनला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या ७० हजारावर पोहोचेल.

Web Title: Randeep Hooda firefighters 'face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.