मुंबई : जिवाची पर्वा न करता आगीत उडी घेऊन मुंबईकरांचे प्राण वाचविणारे अग्निशमन दलाचे जवान म्हणजे खरे आदर्शच़ मात्र, ही जोखीम पत्करून या दलामध्ये प्रवेश घेणारे कमीच आहेत़ तरुणांना स्वेच्छेने स्वयंसेवक म्हणून या दलात येण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे़ त्यानुसार, प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा आता अग्निशमन दलाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे़अग्निशमन दलाच्या ताफ्यात आजच्या घडीला जवान व अधिकारी मिळून सुमारे तीन हजारांचा ताफा आहे़ मुंबईत दरवर्षी आगीच्या घटना वाढत असल्याने हा ताफा अत्यंत तोकडा पडत आहे़ यामुळे सध्या ताफ्यात असलेल्या जवानांवरही ताण वाढतो आहे़ म्हणूनच जास्तीत जास्त तरुणांना अग्निशमन दलाकडे आकर्षित करण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडरचा शोध गेले अनेक दिवस सुरू होता़ अखेर सध्या गाजत असलेला रणदीप हुडा याच्याशी संपर्क करण्यात आला़ १४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताहात रणदीप कॅम्पेनला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या सात हजारांवरून ७० हजारपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे़ या वृत्ताला अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनीही दुजोरा दिला आहे़ (प्रतिनिधी)अग्निशमन सप्ताहात जनजागृती१४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सप्ताह असल्याने गुरुवारपासून रणदीप कॅम्पेनला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या ७० हजारावर पोहोचेल.
रणदीप हुडा अग्निशमन दलाचा ‘चेहरा’
By admin | Published: April 12, 2016 1:44 AM