Join us  

जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये ‘रंग केसरी’ ७५ कलाकारांचे चित्र प्रदर्शन; उद्या शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 9:26 AM

J. J. School of Art : मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १२ ऑगस्टपासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, सांस्कृतिक व्यवहार मंत्रालय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पर्यटन विकास प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने ‘रंग केसरी’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये १२ ऑगस्टपासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. १८ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईची प्रस्तुती असलेल्या ‘रंग केसरी’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून ७५ चित्रकारांनी काढलेली चित्रे मांडण्यात आली आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या चित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.

सांस्कृतिक मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलासंचालक प्रा. विश्वनाथ साबळे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्राधिकरणाचे चंद्रशेखर जयस्वाल, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिव्याख्याते शशिकांत काकडे यांच्या प्रयत्नांतून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 

कोण आहेत चित्रकार ?

अभिषेक आचार्य, अमित ढेणे, अमित दास, अमित सुर्वे, अमोल सत्रे, अनीश नेत्तायम, अमित वर्मा, अनिल अष्टमुडी, अनिल नायक, अनिरुद्ध सूर्यवंशी, अशोक बी. एस., बालाजी उबाळे, अमित कुमार, ब्रजमोहन आर्या, सिबी मॅथ्यू सॅम्युअल, दीपक पाटील, दीप्तीश दास्तीदार, डॉ. बाबुराव नादोणी, फारुख नदाफ, गजानन शेळके, गौरब दास, गोविंद विश्वास, हरीश मेहरानिया, हितेश चौधरी, जयप्रकाश चौहान, जसप्रीत सिंग, कादीर खान, कमलेश डांगी, कविश कलरफ्लॅास, किशन सोनी, किशोर नादवडेकर, प्रदीप कुमावत, मदन लाल, मधुकर कारळे, महावीर पाटील, मोग्लॅन श्रावस्ती, मौत्रेयी कुमार, मोनू कुमार, ओमकार बानौले, पंकज वर्मा, प्रभिंदर लाल, प्रफुल्ल नायसे, प्रकाश सोनावणे, पुरुषोत्तम आडवे, रवींद्रन चंदनथोपे, रवींद्र दास, रेंजीतलाल एम. एन., ऋषी कपिल, रोहन कोळी, सागर कांबळे, संदीप शिंदे, संदेश मोरे, संजय अष्टपुत्रे, संजय टिक्काल, संतोष पेडणेकर, सर्वेश कुमार, सास्वती चौधरी, सत्यपाल टी. ए., शार्दूल कदम, शिबू चंद, शिफा हुसैन, श्रीकांत राजपूत, सिंधू दिवाकरन, सुमना डे, सुमना गिल्ले, स्वाती साबळे, विजयराज बोधनकर, वैशाली पाटील, दिलीप कदम, अक्षय माने, रवींद्र मुळे, प्रवीण वाघमारे, सीमा गोंदणे, सत्यम मल्हार, विक्रम परांजपे, मुकेश धिमन या चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

टॅग्स :मुंबई