गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

By मनोहर कुंभेजकर | Published: March 7, 2023 07:09 PM2023-03-07T19:09:46+5:302023-03-07T19:11:09+5:30

विशेष म्हणजे सोसायट्यांमधील लहानांपासून ते मोठ्यां पर्यंत नागरिकांसह महिलांनी आणि तरुणांनी यात सहभाग घेतला.

rang panchami celebration in housing societies | गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रंगपंचमीचा जल्लोष

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी निर्बंधमुक्त महाराष्ट्र केला.आणि आता कोविड हद्दपार झाला असल्याने तीन वर्षांनंतर आज पश्चिम उपनगरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ठिकठिकाणी डीजेच्या तालावर रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळाला.विशेष म्हणजे सोसायट्यांमधील लहानांपासून ते मोठ्यां पर्यंत नागरिकांसह महिलांनी आणि तरुणांनी यात सहभाग घेतला.

न्यू दिंडोशी एकदंत सोसायटी इमारत क्रमांक २० आणि २१ मध्ये येथील स्त्री पुरुष,तरुण तरुणी यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.आणि विशेष म्हणजे सकाळी चहा,गरम भजी,थंडाई तसेच दुपारी रंगपंचमी संपल्यावर खास गरम गरम जेवण असा बेत होता.आणि येथील रहिवाश्यांना जल्लोषात रंगपंचमी साजरी करता यावी यासाठी पालिकेच्या पाण्याचा अपव्यय टाळून १०००० लिटरचे दोन ट्रॅकर मागवले होते. आणि ट्रॅकरच्या पाण्याच्या फवाऱ्यात नागरिकांनी चिंब भिजून रंगपंचमी जल्लोषात साजरी केली.तर सोसायटीने रंगाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिक देखिल विविध रंगानी उजळून निघाले होते अशी माहिती न्यू दिंडोशी एकदंत सोसायटीचे अध्यक्ष मारुतीशेठ उगले व खजिनदार राजू मनवे यांनी दिली.

वर्सोवा यारी रोड येथील इनलॅक्स नगर कॉ हौसिंग सोसायटीत यंदा कोविडच्या तीन वर्षा नंतर रंगपंचमीचा जल्लोष होता. येथील नागरिक,तरुण,तरुणी आणि महिला मोठ्या संख्यने रंगपंचमीला उतरले होते.येथील सोसयटीच्या डी ब्लॉकच्या परिसरात रंगपंचमीसाठी रेन डान्सची सुविधा तसेच येथील २९२ रहिवाश्यांसाठी अल्पोपहारची व्यवस्था केली होती अशी माहिती इनलॅक्स नगर कॉ हौसिंग सोसायटीचे सचिव चंद्रमोहन खुशवा आणि सदस्य अँड.ज्योती उपाध्ये यांनी दिली.

तर वर्सोवा,यारी रोड,सात बंगला,जुहू येथील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी रंगपंचमी नंतर वर्सोवा,सात बंगला आणि जुहू चौपाटीवर गर्दी करत समुदाच्या पाण्यात डुबकी मारली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rang panchami celebration in housing societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी 2023