लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फादर जोसेफ पिठेकर लिखित व डिंपल पब्लिकेशन प्रकाशित ‘समुपदेशन, तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माणिकपूर चर्चच्या सभागृहात रंगला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्यात अध्यक्ष फादर जोएल डिकुन्हा यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले.
इंग्लिश फाऊंटनचे संस्थापक प्रकाश अल्मेडा यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. हे पुस्तक केवळ व्यावसायिक समुपदेशकांनाच नव्हे; तर शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासाठीही उपयोगाचे आहे. आज सर्व स्तरातील लोकांवर ताणतणाव वाढलेला आहे. अशाप्रकारचे पुस्तक आधीच यायला हवे होते, असे ते यावेळी म्हणाले. याच कार्यक्रमात फादर जाॅन फरोज यांच्या ‘आदिवंत’ व ‘साक्षात्कार दिव्यत्वाचा’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. प्रकाशक अशोक मुळे यांनी पुस्तकांतील आशयाबद्दल समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------