पालिकेच्या वरळी येथील कार्यालयात रंगली सूमधुर संगीताची मैफल
By मनोहर कुंभेजकर | Published: October 21, 2022 06:44 PM2022-10-21T18:44:58+5:302022-10-21T18:45:24+5:30
Mumbai: कोविड नंतर दोन वर्षांनी मुंबई सह राज्यात दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.पालिकेच्या इतिहासात प्रथमच वरळी येथील कार्यालयात दिपावली निमित्त सूमधुर गाण्यांची अनोखी मैफील रंगली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - कोविड नंतर दोन वर्षांनी मुंबई सह राज्यात दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.पालिकेच्या इतिहासात प्रथमच वरळी येथील कार्यालयात दिपावली निमित्त सूमधुर गाण्यांची अनोखी मैफील रंगली. पालिकेचे उपायुक्त ( पायाभूत सुविधा ) उल्हास महाले यांनी त्यांच्या खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी सांगतिक दिवाळी साजरी केली. प्रथमच एक आगळा वेगळा सांगतिक मैफीलीचा कार्यक्रम आयोजित केल्याने उपायुक्त पायाभूत सुविधा यांच्या कार्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आढळले.
या सांगतिक मैफलीत ऐका दाजीबा फेम वैशाली सामंत,पद्मश्री सुरेश वाडकर,प्रसिद्ध गायिका अर्चना भेलांडे, पी.गणेश यांच्या बहारदार गीतांनी या संगीत मैफलीत रंगत आणली. तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी केले.तर चक्क उल्हास महाले यांनी उकृष्ठ निरुपण करून येथील कर्मचाऱ्यांची दाद मिळवली.
या संगीत मैफलीची सुरवात पार्श्वगायिका अर्चना भेलांडे यांनी " ज्योती कलग झलके" या गाण्याने केली आणि गानकोकिळा लता मंगेशकर तसेच बापूजी सुधीर फडके यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर प्रसिद्ध गायक पी.गणेश यांनी किशोर कुमार,कुमार सानू व मिका सिंग यांची गाणी पेश करून धमाल उडवून दिली.तर गायक सर्वेश मिश्रा यांनी महमद रफी यांची गाणी सादर केली.
ऐका दाजीबा फेम वैशाली सामंत यांनी दोन गाणी पेश करून या संगीत मैफलीत जोरदार रंगत आणली.त्यांच्या पांडू या चित्रपटातील भूरम भूरुम या गाण्यावर तर येथील कर्मचाऱ्यांनी ठेकाच धरला.यावर कळस म्हणजे त्यांच्या आवडीची गाणी सादर केली.त्यांनी कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर केला.तर उपायुक्त उल्हास महाले यांनी सुंदर निरुपण सादर केले आणि सरते शेवटी त्यांनी खास दिवाळी साठी स्वतःची कविता सादर करून रंगलेल्या या सांगतिक मैफलीची सांगता केली.