जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेबाहेर रांगा

By admin | Published: March 29, 2017 08:19 PM2017-03-29T20:19:35+5:302017-03-29T20:19:35+5:30

जुन्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली

Range out of the Reserve Bank to replace old notes | जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेबाहेर रांगा

जुन्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेबाहेर रांगा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - जुन्या नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे, या अफवेमुळे बुधवारी आरबीआयच्या मुख्यालयाबाहेर भलताच गोंधळ उडाला. जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी लांब रांगा लावल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे कळताच सर्वांचाच हिरमोड झाला.
जुन्या नोटा बदलण्याच्या तारखेत वाढ केल्याची खोटी पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची खातरजमा करण्यासाठी काही नागरिकांनी बुधवारी थेट आरबीआयचे मुख्यालयच गाठले. मात्र या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी ग्राहकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पुण्यातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या शाईन शेख यांनी केला. शेख म्हणाल्या की, पुण्यातील आरबीआयच्या शाखेत सोमवारी १० हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी गेलो होतो.
मात्र त्याठिकाणी नोटा बदलता येणार नसल्याचे सांगत संबंधित कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आरबीआय मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र याठिकाणी नोटा स्वीकारल्या जात नसून या नोटांवर नाश्ता करण्याचा उपरोधिक सल्ला दिला
गेला. त्यामुळे नेमके कुणाचे खरे मानायचे या संभ्रमात असल्याचे शेख यांनी सांगितले.
आरबीआयच्या नावाने खोटी पोस्ट व्हायरल झाली असेल, तर त्याचा खुलासाही आरबीआयने करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया स्नेहा तरडे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, नोटा बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांना उपरोधिक सल्ले दिले जात आहेत. मुळात खोट्या माहितीमुळे काही ग्राहक याठिकाणी जमले आहे. मात्र बरेचसे ग्राहक हे बँकांच्या स्थानिक शाखांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्याने धडकले. त्यामुळे आरबीआयने पत्रक किंवा व्हीडीयोद्वारे लोकांमधील हा गोंधळ दूर करावा. याउलट याठिकाणचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांना योग्य माहिती देण्याऐवजी स्वत:चे नाव
लपवून टोमणे मारत असल्याने लोकांचा संताप होत आहे.
...........................
घरी जाण्याचे पैसे नाहीत
अवघ्या एक हजार रुपयांची नोट बदलण्यासाठी नाशिकहून आलो आहे. पैसे बदलून मिळाले नसल्याने आता तर घरी जायलाही पैसे नाहीत. त्यामुळे आणखी दोन दिवसांत नोटा बदलून मिळतील का? या चिंतेसह घरी जाण्याचा प्रश्न पडला आहे, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने व्यक्त केला.
............................
हेल्पलाईनचाही आधार नाही
स्टेट बँक आॅफ महाराष्ट्रच्या हेल्पलाईन क्रमांकावर पोस्टची शहानिशा करण्यासाठी फोन केला होता. मात्र तेथेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप कोल्हापूरहून आलेल्या राजेश बेनाडे यांनी केला. २० हजार रुपये किमतीच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी इचलकरंजी येथील एसबीआयच्या शाखेत गेल्यानंतर समाधान झाले नाही. मात्र मुंबईतील आरबीआयच्या शाखेत जाण्याचा सल्ला मिळाल्याने येथे आल्याचेही त्यांनी सांगितले.
...........................
पाचशेपासून पंचवीस हजार बदलण्यासाठी गर्दी
कुर्ल्यापासून गुजरातपर्यंतच्या विविध ठिकाणांहून लोक जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी रांगेत दिसले. महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या पाचशे रुपयांपासून २५ हजार रुपये किंमतीच्या जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा लोकांना बदलायच्या होत्या. मात्र याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरबीआयतर्फे खुलासा करण्यासाठी प्रवेशद्वाराबाहेर एकही अधिकारी आल्याचे दिसले नाही.

(छायाचित्र- दत्ता खेडेकर)

Web Title: Range out of the Reserve Bank to replace old notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.