राणीची बाग श्रीगणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली; BMC चा निर्णय

By सचिन लुंगसे | Published: August 26, 2022 04:15 PM2022-08-26T16:15:24+5:302022-08-26T16:15:42+5:30

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना पर्यावरणाचा आनंद घेता यावा, म्हणून निर्णय 

Rani Bagh opens to public on Shri Ganesh Chaturthi; Decision of BMC | राणीची बाग श्रीगणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली; BMC चा निर्णय

राणीची बाग श्रीगणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली; BMC चा निर्णय

googlenewsNext

सचिन लुंगसे 

मुंबई : येत्या बुधवारी म्हणजेच दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘श्रीगणेश चतुर्थी’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेच्या सुविधेकरिता खुले राहणार आहे. जेणेकरुन या सुट्टीच्या दिवशी लहान-थोरांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल व एकूणच तेथील पर्यावरणाचा आनंद घेता येईल.

मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी विरंगुळ्याची ठिकाणेही उपलब्ध करुन देत असते. या विरंगुळ्याच्या ठिकाणांपैकी अत्यंत महत्त्वाचे विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे भायखळा पूर्व परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय ! या उद्यान व प्राणिसंग्रहालयाची साप्ताहिक सुट्टी ही दर बुधवारी असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते. त्यानुसार 

वरीलनुसार बुधवारी सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार सदर प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे. हे उद्यान साप्ताहिक सुट्टीचा दिवस वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी नागरिकांसाठी खुले असते. त्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान उद्यानाची तिकीट खिडकी सुरु असते. तर उद्यान सायंकाळी ६.०० वाजता बंद होते. 

या उद्यानात प्रवेशासाठी प्रती व्यक्ती रुपये ५०/- इतके शुल्क असून वयवर्ष ३ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी रुपये २५/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येते. विशेष म्हणजे आई - वडिल आणि १५ वर्षे वयापर्यंतची २ मुले अशा ४ व्यक्तिंच्या कुटुंबासाठी रुपये १००/- इतके एकत्रित शुल्क आकारण्यात येते.

Web Title: Rani Bagh opens to public on Shri Ganesh Chaturthi; Decision of BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.