मुंबई : निवडणुकीच्या काळात पेंग्विन दर्शनाच्या उद्घाटनाची घाई महापालिकेला चांगलीच महागात पडली़ याप्रकरणात प्राणी संग्रहालयाची परवानगीच रद्द होण्याची वेळ आली होती़ या अनुभवातून धडा घेतल्यानंतर नवीन प्राणी आणताना सबुरीचा मार्ग प्रशासनाने अवलंबिला आहे़ नवीन पिंजरे आणि प्राण्यांच्या देखभालीच्या व्यवस्थेची खात्री झाल्यानंतरच प्राण्यांना आयात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय म्हणजेच प्रसिद्ध राणीच्या बागेत जुलैअखेरीच पेंग्विनचे आगमन झाले़ मात्र, हेम्बोल्ट जातीच्या आठ पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उठले. लोकायुक्तांपासून केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या नोटीसचा सामना महापालिकेला करावा लागला़ यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पेंग्विनच्या मृत्यूचे पडसाद उमटले़या अडचणींना सामोरे जात पेंग्विनचे काचघर तयार झाले़ त्यामुळे आता दुसऱ्या प्राण्यांसाठी पिंजरे तयार करण्याचे काम आता सुरू होणार आहे़ एप्रिल महिन्यात या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे़ असे १७ पिंजरे बांधण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे़ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अशाच काही परदेशी प्राण्यांचे राणीबागेत आगमन होणार आहे़ मात्र, त्यांचे पिंजरे तयार झाल्यानंतरच त्यांना मुंबईत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़पेंग्विनच्या मृत्यूने महापालिका अडचणीतहेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन दक्षिण कोरियातून जुलै महिन्यात मुंबईत आणण्यात आले़ मात्र, यापैकी दीड वर्षांच्या डोरा या पेंग्विनचा आतड्यांच्या संसर्गाने आॅक्टोबर महिन्यात मृत्यू झाला़ निवडणुकीच्या काळातच पेंग्विनचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला घेरले़ लोकायुक्तांची प्राणीसंग्रहालयास नोटीस, प्राणीसंग्रहालय का बंद करू नये, अशी केंद्रीय प्राणी संग्रहालयाकडून कारणे दाखवा नोटीस महापालिका प्रशासनाला आली़राणीच्या बागेत नवीन पाहुणेराणीच्या बागेत पेंग्विन आल्यानंतर आता आणखी काही नवीन पाहुणे येणार आहेत़ यामध्ये तरस, वाघ, सिंह, चिता असे नेहमीचे पाहुणे आहेच़ मात्र, अफ्रिकन काळवीट आणि कांगारू हे विशेष आकर्षण असणार आहे़ या प्राण्यांसाठी पिंजरे बनविण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे़ (प्रतिनिधी)बोगस कंपनीने रखडले पिंजऱ्यांचे कामपेंग्विनसाठी राणीबागेत काचघर बांधण्याबरोबच अन्य प्राण्यांसाठीही पिंजरे बनविण्याचे काम हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे होते़ मात्र, ही कंपनीच बोगस असल्याचे उजेडात आल्यानंतर त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले़ पेंग्विनचे काम अर्ध्या टप्प्यावर आल्याने ते या कंपनीकडून पूर्ण करून घेण्यात आले़ मात्र, १७ पिंजरे बांधण्याचे काम आता नवीन ठेकेदाराला देण्यात येणार आहे़ यासाठी नोंव्हेंबर २०१६ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या़ १५ मार्च, २०१७ रोजी निविदेचे पाकीट खोलण्यात येणार आहे़ त्यानंतर एप्रिलपासून कामाला सुरुवात होईल़
राणीबाग आणखी पाहुण्यांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 14, 2017 4:28 AM