राणीबाग शुल्कवाढ लांबणीवर

By admin | Published: May 22, 2017 02:33 AM2017-05-22T02:33:57+5:302017-05-22T02:33:57+5:30

राणीबाग प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाचा गेम त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव

Ranibagh deferred for a long time | राणीबाग शुल्कवाढ लांबणीवर

राणीबाग शुल्कवाढ लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राणीबाग प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपाचा गेम त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. त्यामुळे गटनेत्यांच्या बैठकीत दरवाढीशी सहमत असणारे भाजपाचे गटनेते आणि विरोध करणारे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात समन्वय नसल्याचा निशाणा शिवसेनेने साधला आहे. या प्रस्तावावर स्थायी समितीमध्ये आज चर्चा होणार असताना भाजपा गटनेते गैरहजर राहिल्याने या आरोपांवरून चर्चेला उधाण आले आहे.
राणीची बाग आणि पेंग्विन दर्शनाच्या शुल्कात २० पट वाढ करण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर बाजार व उद्यान समितीमध्येही दरवाढीला मंजुरी मिळाली. या प्रस्तावाला विरोधकांचा आक्षेप आहे. ही संधी साधून भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. समान संख्याबळ असलेल्या
भाजपाने विरोधकांच्या मदतीने हा प्रस्ताव फेटाळून लावण्याची तयारी केली आहे.
भाजपाची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला आहे. गटनेत्यांच्या बैठकीत भाजपाने या प्रस्तावाला विरोध केला नाही. त्यांचे गटनेते मनोज कोटक समर्थन करतात तर मुंबई अध्यक्ष विरोध करत आहेत.
केवळ सेनेला लक्ष्य करण्यासाठी भाजपाकडून शुल्कवाढीचे राजकारण फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राणीबाग झाले ओव्हरफ्लो! : उन्हाळ्यातील सुटीच्या जोडीला रविवार आल्याने पर्यटकांनी मोठ्या संख्येने राणीबागेत गर्दी केली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पर्यटकांची तिकीटघराबाहेरील रांग मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर गेली होती. तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठीही जागा उपलब्ध नसल्याने वाहनांसाठी मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ५ वाजता बंद होणारे उद्यान शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी दुपारी ३ वाजताच बंद केले जाते. मात्र पर्यटकांना ही माहिती नसल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत उद्यान खुले ठेवल्यानंतरही पर्यटकांची संख्या वाढतच होती. अखेर सुरक्षारक्षकांनी चार वाजता प्रवेशद्वार बंद ठेवत पर्यटकांची समजूत घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

च्देशातील, राज्यातील किंवा शहरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विविध वैधानिक समितीच्या बैठकांमध्ये तसेच सभागृहामध्ये शोकप्रस्ताव आणून बैठका तहकूब केल्या जातात.
च्परंतु केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या निधनाबाबत महापालिकेतील स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात येणार नसल्याचे समजताच भाजपाच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी समिती अध्यक्षांची भेट घेऊन शोकप्रस्ताव आणून सभा तहकूब करण्यास भाग पाडले. त्यामुळे या प्रस्तावावरील चर्चा लांबणीवर पडली आहे.

भाजपा गटनेते गैरहजर : हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर आज मांडण्यात आला. मात्र भाजपाचे गटनेते या बैठकीस गैरहजर राहिले. गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला समर्थन दिल्यानंतर आता विरोध कसा करायचा या संकटात सापडल्याने कोटक बैठकीला आले नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरवाढ कमी होणार
विरोधक आणि भाजपा एकत्रित येऊन दरवाढीचा प्रस्ताव फेटाळणार आहेत. यामुळे सत्तेवर असूनही भाजपापुढे पराभव होईल, या विचाराने शिवसेना धास्तावली आहे. त्यामुळे या विरोधाची हवा काढण्यासाठी प्रवेश शुल्क शंभरवरून ५० रुपयांवर आणण्यात येणार आहे.

Web Title: Ranibagh deferred for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.