मुंबई : उपनगरात एसआरए योजना राबविणाऱ्या विकासकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा शकीलच्या भावासह तिघांवर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ओशिवऱ्यात गुन्हा दाखल केला आहे.
खंडणीविरोधी पथकाकडे उपनगरातील विकासकाने तक्रार दिली होती. ज्यात ते एसआरए योजनेंतर्गत विकास करत असलेल्या इमारतीमध्ये राहणारा भाडोत्री शेख अरबाज नईम हा त्याच्या खोलीच्या बदल्यात पात्रतेपेक्षा अधिक खोल्या तसेच रोख रक्कमेची मागणी करत आहे. तसेच याप्रकरणी विकासकाला छोटा शकीलचा भाऊ अन्वर याच्याकडून धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख योगेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाई करत अन्वर, त्याचा हस्तक राजू उर्फ कामरान व नईम यांच्याविरोधात ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.