छाप्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:26 PM2018-03-22T23:26:56+5:302018-03-22T23:26:56+5:30

रुग्णालयावर आयकर विभागाचा छापा टाकण्याची धमकी देत ७० वर्षाच्या डॉक्टरकडून खंडणी उकळण्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

Ransom, threatened by a doctor threatening the raids | छाप्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी, गुन्हा दाखल

छाप्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी, गुन्हा दाखल

Next

मुंबई : रुग्णालयावर आयकर विभागाचा छापा टाकण्याची धमकी देत ७० वर्षाच्या डॉक्टरकडून खंडणी उकळण्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
दहिसर पूर्वेकडील परिसरात डॉ. आनंद महांबरे (७०) हे कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे एस.व्ही रोडवर महांबरे चिल्ड्रन हॉस्पीटल आहे. शनिवारी त्यांना खेडेकर नावाच्या इसमाने फोन केला, ’व्यवसायात आर्थिक घोटाळा केला असून लवकर आयकर विभागाचा छापा पडणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्याने स्वत:चे आयकर विभागासोबत लागेबांधे असल्याचे सांगितले. आपल्या मदतीनेच हे छापे पडणार असल्याच्या माहितीने महांबरे यांना धक्का बसला. हा छापा टाळण्यासाठी खेडेकरने १ लाख रुपयांची मागणी केली. महांबरे यांनी घाबरुन तडजोड करुन त्याला ६० हजार रुपये दिले.
त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा खेडेकरने फोन करुन आणखीन १ लाखाची मागणी केली. मात्र यावेळेस महांबरे यांना संशय आल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा खेडेकरने त्यांना आयकर विभागाकडून छापा टाकण्याची धमकी दिली. भितीने महांबरे यांनी पुन्हा २० हजार रुपये दिले.
संध्याकाळपर्यंत उर्वरीत ८० हजार रुपये देण्यासाठी खेडेकरकडून धमकाविण्यास सुरुवात झाली. अखेर खेडेकरच्या वाढत्या मागण्यांमुळे महांबरे यांनी सोमवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. महांबरे यांनी केलेल्या वर्णनावरुन त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती दहिसर पोलिसांनी दिली.

Web Title: Ransom, threatened by a doctor threatening the raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा