Ranveer Allahbadia on India's Got Latent: समय रैनाचा शो इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये (India's Got Latent) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शो मधील एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) आणि अपूर्वा मखीजा (Apoorva Mukhija) स्पर्धकाला प्रश्न विचारतात. रणवीर जो प्रश्न विचारला आहे, तो इथे सांगता येणार नाही, इतका अश्लील आहे. सोशल मीडियावर यावरून संतापाची लाट उसळली असून, आता मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे.
इंडियाज गॉट लॅटेंट शोमध्ये यावेळी गेस्ट जज म्हणून आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि अपूर्वा मखीजा हे कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते. अपूर्वा मखीजा इन्स्टाग्रामवर द रिबेल किड म्हणून ओळखली जाते. याच शो मध्ये युट्यूबर, पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाही आहे.
रणवीर अलाहाबादियाने स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारला आणि दोन पर्यायांपैकी एक निवड म्हणून सांगितले. त्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून, लोक कारवाईची मागणी करत आहेत.
मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखीजा आणि समय रैना आणि आयोजकांविरोधात मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. शोमध्ये अश्लाघ्य भाषा वापरली जात असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे लोक पातळी सोडत चालले आहेत
स्टोरीटेलर नीलेश मिश्रा यांनी व्हिडीओची क्लिप शेअर करत नाराजी व्यक्त केली.
"आपल्या देशातील क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या या भ्रष्ट क्रिएटिव्हर्संना बघा. मला विश्वास आहे की, यातील प्रत्येकाचे लाखो फॉलोअर्स आहेत. हा कंटेंट फक्त प्रौढांसाठी बनवलेला गेला नाहीये. अल्गोरिदमने ठरवले तर एक मुलही हे सहजपणे पाहू शकतो. तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी या लोकांना सामान्य करून टाकलं आहे. भारतात शालिनतेला बढावा दिला जात नाहीये. हे क्रिएटटर्स, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी पातळी सोडत चालले आहे. हे क्रिएटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही म्हणू शकतात आणि वाचू शकतात", अशा शब्दात नीलेश मिश्रा यांनी संताप व्यक्त केला आहे.
एका यूजरने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका केली आहे. कौन बनेगा करोडपती मध्ये असे चेहरे आणल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनाही लाज वाटली पाहिजेत. अलिकडेच झालेल्या शो मध्ये कंटेंट क्रिएटर तन्मय भट, भुवन बाम आणि कामिया जानी, समय रैना यांना बोलवण्यात आले होते.