Join us

रणवीर, अर्जुन कपूर यांना दिलासा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 4:24 AM

एनआयबी नॉकआउट या कार्यक्रमात अश्लील भाषा वापरल्याबद्दल बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह व अर्जुन कपूर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याप्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

मुंबई - एनआयबी नॉकआउट या कार्यक्रमात अश्लील भाषा वापरल्याबद्दल बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह व अर्जुन कपूर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याप्रकरणी अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.याप्रकरणी आणखी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच विधि महाविद्यालयाच्या प्राध्यापकानेही याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी एकत्रित घेण्याची परवानगी हंगामी मुख्य न्यायाधीशांकडून घेण्याचे निर्देश न्या. आर. एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने रणवीर व अर्जुनच्या वकिलांना दिले. आयोजक व यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांवर गुन्हा नोंदवावा, अशी विनंती जनहित याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकांद्वारे करण्यात आलेल्या विनंतीचा विचार करण्यात येईल, सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यासंदर्भात आदेश घेऊन या, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :गुन्हाकरमणूक