'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:42 AM2018-01-30T11:42:02+5:302018-01-30T11:44:01+5:30

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.

Ranveer Singh gets first award for Padmaavat from Amitabh Bachchan | 'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

Next

मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनादेखील रणवीर सिंहच्या अभिनयानं भुरळ घातली आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून रणवीर सिंहला एक सरप्राइजदेखील मिळालं आहे. अमिताभ बच्चन यांनी रणवीर सिंहच्या अभिनयाची स्तुती करत त्याच्या निवासस्थानी फुलांचा गुच्छ आणि पत्र पाठवले आहे. अभिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेले गिफ्ट पाहून रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्षणाचाही विलंब न लावता रणवीरनं बिग बींकडून मिळालेल्या सरप्राइजचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. 'मला माझा अवॉर्ड मिळाला', असे कॅप्शनही त्यानं फोटोला दिले.  

''अमिताभ बच्चन यांच्याकडून मला पत्र मिळालं. त्यांच्याकडून मिळालेलं सरप्राइज माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी मिस्टर बच्चन यांच्या जवळ असल्याचे मला जाणवते. प्रत्येक वेळी ते माझ्या अभिनयाचं कौतुक करतात आणि त्याबाबत स्वहस्ते लिहिलेले पत्र मला पाठवतात'', असे रणवीरनं सांगितले.  

मला जेव्हा जेव्हा बिग बींकडून (पत्र) सन्मान मिळाला आहे, तेव्हा तेव्हा त्या पत्राची फ्रेम बनवतो. यानंतर ती फ्रेम थेट बँक लोकरमध्ये जाते. ती फ्रेम मी घरात ठेवत नाही. त्यांच्याद्वारे व्यक्त झालेल्या भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझे अवॉर्ड्स घरातच असतात मात्र त्यांनी दिलेली पत्रं मी बँक अकाऊंटमध्ये ठेवतो, असंही रणवीरनं सांगितलं. 

यापूर्वीही महानायक अमिताभ बच्चन यांनी रणवीर सिंह यांच्या अभिनयाचं कौतुक केले आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीनं अमिताभ बच्चन यांनी रणवीरला पत्र व गुच्छ पाठवून सरप्राइज दिले आहे. 2015मध्ये रिलीज झालेल्या 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर सिंहच्या अभिनयाचंही अमिताभ यांनी कौतुक केले होते.



 

Web Title: Ranveer Singh gets first award for Padmaavat from Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.