ठाणो : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणा:या भरतसिंग बाबुसिंग राठोड (26) याला ठाणो जिल्हा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेसह हत्या करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याप्रकरणी पाच वर्षाची आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा आणि या चारही गुन्ह्यांसाठी 20 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवा भागात 2 मार्च 2क्12 रोजी ही घटना घडली होती. या भागात राहणारी बारावर्षीय अल्पवयीन मुलगी दुपारी 3 वाजता टय़ुशनसाठी घरून निघाली होती. ती रोज सव्वापाच वाजेर्पयत घरी येत असे. परंतु, सायंकाळी उशिरार्पयत ती घरी न आल्याने अखेर तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर, भरतसिंग हा ज्या इमारतीत राहत होता, त्या इमारतीच्या मागील बाजूस एक गाठोडे त्यांना आढळून आले. ते खोलले असता त्यात तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, तिच्या घरच्यांनी यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुंब्रा पोलिसांनी भरतसिंगला अटक केली. शनिवारी या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश व्ही.के. गिरकर यांच्यासमोर झाली असता 22 साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्यात भरतसिंग याला दोषी ठरवून न्यायालयाने त्याला बलात्कार
आणि हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप सुनावली. (प्रतिनिधी)