मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी घडली. या प्रकरणी बलात्कार, अपहरण, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्दमध्ये राहत असलेल्या ७ वर्षीय चिनू आणि १२ वर्षीय सोनू बुधवारी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत होत्या. तेव्हा त्यांच्यावर वाईट नजर असलेल्या १४ आणि १२ वर्षांच्या मुलांनी त्यांचे अपहरण केले. अपहरण करून जवळील एका खोलीत नेऊन त्यांना डांबले. तेथे त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. दरवाजाच्या आतून आवाज येत असल्याने स्थानिकांनी त्याकडे धाव घेतली असता, हा प्रकार उघडकीस आला. दोघींनीही त्यांच्या तावडीतून सुटका करत घराकडे धाव घेतली. कुटुंबीयांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून दोघीही अजून सावरलेल्या नाहीत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानखुर्द पोलीस पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा प्रयत्न
By admin | Published: October 10, 2015 4:43 AM