लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळीमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीला तिच्या अल्पवयीन प्रियकराने लोअर परळमधील मित्राच्या घरी नेत, त्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यादरम्यान त्याचे अन्य ४ मित्र खालच्या खोलीत थांबले होते. याप्रकरणी बलात्कारासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या दोघांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री आठ ते साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली. यातील पीडित मुलगी ही तिच्या वरळीतील घराजवळील मैदानात फिरायला गेली होती. तेथे तिचा १६ वर्षीय प्रियकर हा त्याचा मित्र शुभम शिवगन (१८) याच्यासोबत दुचाकीवरून आला. प्रियकराने मुलीला सोबत येण्याचा आग्रह केला.
मुलीगीही त्याच्यावर विश्वास ठेवून गेली. मात्र, तिच्या अल्पवयीन प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सनीश यानेही तिच्यावर बलात्कार केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. यादरम्यान त्याचे चार मित्र खालच्या खोलीत थांबले होते. कोणीही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. तीन अल्पवयीन आरोपींना डोंगरी येथील बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून, अन्य तीन आरोपींना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे मुलीला मानसिक धक्का बसला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"