- एकाला पोक्सो अंतर्गत अटक
आरेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
व्हिडीओ बनवून केले ब्लॅकमेल : पोक्सोअंतर्गत आराेपीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा मोबाइलवर व्हिडीओ बनवून मुलीला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा प्रकार गोरेगावमध्ये घडला. याप्रकरणी आरे पोलिसांनी मंगळवारी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली.
आरोपी हा पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरात राहतो. त्याच्या पत्नीशी पीडितेशी मैत्री आहे. याचाच फायदा घेत काही बहाण्याने त्याने तिला आरेच्या जंगलात बोलावले. त्यानुसार ती गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. याला पीडिता कंटाळली आणि अखेर तिने आरे पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चाैकशी सुरू आहे.