रिपाइं खरात गट राष्ट्रवादीच्या पाठिशी

By admin | Published: October 12, 2014 01:09 AM2014-10-12T01:09:10+5:302014-10-12T01:09:10+5:30

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) आणि विद्यार्थी रिपब्लिकन संघटनेने राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

Rape of the NCP candidate | रिपाइं खरात गट राष्ट्रवादीच्या पाठिशी

रिपाइं खरात गट राष्ट्रवादीच्या पाठिशी

Next
>नवी मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) आणि  विद्यार्थी रिपब्लिकन संघटनेने राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. शहराच्या विकासाच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गणोश नाईक आणि ऐरोली मतदार संघातील उमेदवार संदीप नाईक यांना सामाजिक संस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे. आधुनिक सिटी म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबई शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणोश नाईक आणि संदीप नाईक यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. मतदार संघातील प्रत्येक परिसरातील जनतेशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याकडे असलेले दूरदृष्टी पाहून अनेक संस्थांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाराम खरात, विद्यार्थी संघटनेचे सुशीलकुमार जाधव, नवी मुंबईचे शहराध्यक्ष विनोद जाधव, मुंबई प्रदेश संघटक अशोक देवधेकर यांनी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर तुभ्रेतील भीमज्योत सेवा संघ आणि राष्ट्रीय क्रांतीवाद 
पॉवर संघटनेनेही राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. 
तसेच   बेलापूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार हणुमंतराव जगन्नाथ घारगे-पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्यात निवडणूकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणोश नाईक यांना पाठींबा दिला आहे. घारगे पाटील यांनी तशा आशयाचे पत्र राष्ट्रवादीचे पदाधिकारी अशोक पोहेकर यांना दिले तर नाईकांच्या विकास कामांच्या अजेंडा घराघरात नेऊन त्यांना बहुतमताने निवडून आणण्याचे आवाहन आपल्या कार्यकत्र्याना केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of the NCP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.