उपचाराच्या बहाण्याने माहीम दर्ग्याच्या विश्वस्ताकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:26+5:302021-01-03T04:07:26+5:30

विवाहितेचा आरोप, माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उपचाराच्या बहाण्याने वक्फ बोर्ड महाराष्ट्राचे सदस्य आणि ...

Rape by trustee of Mahim Dargah under the pretext of treatment | उपचाराच्या बहाण्याने माहीम दर्ग्याच्या विश्वस्ताकडून बलात्कार

उपचाराच्या बहाण्याने माहीम दर्ग्याच्या विश्वस्ताकडून बलात्कार

Next

विवाहितेचा आरोप, माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उपचाराच्या बहाण्याने वक्फ बोर्ड महाराष्ट्राचे सदस्य आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त डॉ.मुदासीर लांबेने बलात्कार केल्याचा आरोप ३३ वर्षीय विवाहितेने केला. पुढे याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, विवाहितेला धमकावले. काही महिन्यांनी दोघांच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेही तलाक दिल्यामुळे विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. याच आरोपावरून शुक्रवारी माहीम पोलिसांनी लांबेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली.

तक्रारदार या माहीम परिसरात राहण्यास असून, टेली कॉलिंग कंपनीत कामाला आहे. विवाहितेने केलेल्या आरोपानुसार, गेल्या वर्षी ११ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात लांबेसोबत ओळख झाली. लांबेनी समाजसेवा संबंधित कामानिमित्त भेटण्यास सांगितले. दोन-तीन वेळा कामानिमित्त भेटी झाल्या. पोटाच्या आजाराबाबत लांबे यांना सांगताच, त्यांनी २८ जानेवारी रोजी सर्व रिपोर्ट घेऊन क्लिनिकमध्ये बोलावले. त्यानुसार, क्लिनिकमध्ये गेल्यानंतर कमरेला इंजेक्शन देत, डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे.

पुढे याबाबत पोलिसांत जाण्याचे सांगताच, याचे व्हिडीओ पतीला पाठवून दोघांमध्ये संबंध असल्याची धमकी तिला दिली, तसेच पोलिसांसह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतही संबंध असल्याने आपल्याविरोधात काही करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने, घाबरून तिने याबाबत कुणाला सांगितले नाही. त्यानंतर, वारंवार कॉल करून तिला बोलावून त्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तलाक दिला. तिने याबाबत लांबेला सांगताच, त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. पुढे तो पत्नीच्या गुप्तरोगासाठी बाहेर असल्याचे सांगून तिला टाळू लागला. तिच्याशी बोलणेही बंद केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर, लांबेने तिला धमकाविणे सुरू केले. अखेर, तिने वकिलाकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्याने पोलिसांत तक्रार दिली. गेल्या महिन्यांत ७ डिसेंबर रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला. २० तारखेला जबाब नोंद झाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला.

* सोमवारी बैठक

माहीम दर्गा मानवतेचे व्यासपीठ आहे. या घटनेबाबत विश्वस्त मंडळ सोमवारी बैठक घेऊन पुढील कारवाईचा निर्णय घेतील.

- सोहेल खंडवाणी,

व्यवस्थापकीय विश्वस्त, माहीम दर्गा

----------------

Web Title: Rape by trustee of Mahim Dargah under the pretext of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.