नालासोपारा : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून, मैत्रिणीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, प्रियकराला बलात्कार करण्यासाठी मदत करणाऱ्या मैत्रिणीवरही गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाºया २७ वर्षीय राणीची (नावात बदल) मैत्रीण फियाना (२७) ही नायगाव परिसरात राहते. बुधवारी फियानाने राणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सायंकाळी बोलावले. ७ वाजताच्या दरम्यान राणी फियानाला भेटल्यावर ती तिला स्टेशनजवळ असलेल्या नित्यानंद बार अँड रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. तेथे वाइनमध्ये गुंगीचे औषध टाकून फियानाने राणीला पिण्यासाठी दिले. नशा केली असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी राणीला घेऊन फियाना आपला प्रियकर नरेंद्र कुमार याच्या घरी गेली. घराचा दरवाजा आणि खिडक्या बंद करत, गुंगीत असणाºया राणीवर आरोपी नरेंद्र कुमार याने बलात्कार केला. या वेळी फियाना हिने राणीचे दोन्ही हात पकडून ठेवले होते. बलात्काराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नरेंद्र याने दिली होती. राणी हिने शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकिकत सांगितल्यानंतर, पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांन्वये दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, ते पुढील तपास करत आहेत.वाढदिवस साजरा करण्याचे सांगत पीडित मुलीला नायगाव येथे बोलावून मैत्रिणीच्या प्रियकराने बलात्कार केला. यात मैत्रिणीने मदत केली आहे. ते ज्या हॉटेलमध्ये गेले, तेथील आणि आजूबाजूच्या विभागातील सीसीटीव्ही फुटेजचा तपासासाठी आधार घेणार आहोत.- सरला काळे, पोलीस उपनिरीक्षक, वालीव पोलीस स्टेशन.